Saturday, April 3, 2021

पिंपळ ....

पुढचा दारात आजही तो पिंपळ, तसाच उभा असेल कदाचित 

खोड वठलं असेल, पण मूळ अजूनही हि घट्ट असावीत 


काही पान गळाली , काहींची जाळी झाली 

काही वाऱ्यावर उडाली , थोडी थोडकेच पिंपळाला राहिली 


पिंपळ आता वाट पाहताय ,

कुणी घरटं नाही बांधलं तरी चालेल त्याला आता वाटतंय 

कुणी एखाद पाखरू क्षणभर विसावेल, 

फळ नाही फुल नाही पण सावली घेऊन तरी एखाद पाखरू सुखावेल.. 


मातीत रुजलेल्या पिंपळाला आता ओढ लागली मातीची 

वाढण्याची मर्यादा संपली, आता बेडी फक्त नव्या पालवीची 


ओंकार 

Wednesday, March 24, 2021

भून भून एक सत्य -- just for fun :)

 जेंव्हा जेंव्हा घरामध्ये येईल एखादी सून 

तेंव्हा तेंव्हा सुरु होईल न संपणारी भून भून 


भून भून कॅन नॉट बी क्रिएटेड , अँड कॅन नॉट बी डिस्ट्रोइड 

फक्त ह्या दिवसा मधून त्या दिवसा मध्ये होते ट्रांसफरड 


भून भून  व्हायला नाही लागत काहीही कारण 

लग्न केलाय, पण वाटत असा कि जन्म बायको जवळ तारण 


इतकी बायकोची भून भून कि ती वाटते मधमाशी   

अपॆक्षा मधाची पण भीती जास्त डंखाची 


न पिता जहर कुणी होत नाही महादेव 

आणि भून भून न ऐकेल तो कसला पतीदेव 


हि भून भून न संपणारी आहे,  तिला नाही अंत 

लग्न न करणारे उगाच नाहीत होत पंतप्रधान आणि संत 


- ओंकार 

Thursday, March 18, 2021

लपंडाव ..

तिचा आठवणींनी पण आता लपंडाव खेळायाचा ठरवलंय 

दहा वीस व्हायचा आधीच लपायचा ठरवलंय 


एकांतात रमलेल्या तिचा नि माझा गप्पा 

कितीहि शोधलं तरी देऊन जातात धप्पा 


बराच काळ गेला काही आठवणी तर नाहीच सापडल्या 

लपणायची जागा माहितीची पण पावलांना अवसान नव्हतं जायला 


शोधण्याचा प्रयत्न कि हरवण्यातली गम्मत 

खेळा पेक्षा खेळाडूला अनन्य किंमत 


ओंकार 

Wednesday, March 10, 2021

मी शीड होऊनि झिजलो

 उगाच नाही सरला , प्याला तो जहराचा  

सराव कि मज होता, विषहारी डंखाचा 


झेलाया वादळे अनेक , मी शीड होऊनि झिजलो 

लाहारावे म्हणालो मनाशी तर दिशा हरवून बसलो 


कवटाळून धरली उराशी, वादळे त्या एका गलबतासाठी 

काठावर पोहचलो जेंव्हा, लगबग होती शीड बदलण्यासाठी 

अशी चढावी झिंग..


अशी चढावी झिंग अन क्षणिक का होईना यावा माज..

चिंता नको उद्याची ना फिकीर कालची , सोबतीला फक्त आज 


एकांत हि मग या वेळी हवा हवासा वाटावा 

स्वतःचा च का होईना मग त्या क्षणी हेवा वाटावा


क्षण हि त्यावेळी होतील आतुर 

निसटून जाण्या होतील फितूर 

त्यांनाही दाखवावे लालच हसण्याचे

आमिष द्यावे क्षण भर विश्रांतीचे 


स्वप्नांना तर सांगावे ठासून 

लेकाहो कितीही पळा दाखवेन तुमा गाठून 

हसण्याचा मग वाहतील पाट 

मरगळ हि पाहून होईल चाट 


अशी चढावी झिंग अन क्षणिक का होईना यावा माज...


Onkar 

Sunday, December 20, 2020

ते माझेच होते...

आज एक पांढरपेशी हॉटेल मध्ये एका so called educated मुलाचा आणि बापाचा भांडण चार चौघात पाहिलं. कोण बरोबर कोण चूक याचा निवाडा न करता पुढचा काही ओळी त्या दुर्दैवी ,थकलेल्या आणि कदाचित कुठेतरी चुकलेल्या बापाचा नजरेतून...
____________

झिजले यत्नानी कधीकाळी , ते उंबरे माझेच होते.
क्षण हसरे सोडून धावणारे, ते पायही माझेच होते.

ओलांडले नाही ओठांचे कुंपण ज्यांनी, ते शब्दहि माझेच होते.
दुरावले कधी न परताया , ते क्षण सुखाचे माझेच होते.

पाट वेळीच फिरवली ज्यांनी, ते आप्त हि माझेच होते.
उसळले तेंव्हाही नाही, ते रक्त हि माझेच होते.

पाश सुटले बांध तुटले , जे बांधले मी माझेच होते...
अन कट्यार घुसली जी काळजात, त्यावर ठसे हि माझेच होते....

-ओंकार

Saturday, December 19, 2020

शुभ्र एक चांदणी..

कैफात चांदण्यांचा , ती लक्ख एकाकी 
स्वयं प्रकाशी तरीही , शोधिसी उगा किरणांसी 

कुणी पाहिले सप्तर्षी , कुणी पाहिला ध्रुव तारा
एकटीच हंसूनि ती, हा खेळ पाही सारा 

दिवा स्वप्नात ती नेहमी , कवटाळून ठेवी उराशी टुमदार एक निमबोणी..  
वाडा होताच तो चिरेबंदी , लुप्त जाहली त्यात शुभ्र एक चांदणी..  

Thursday, December 17, 2020

कित्येक....

कित्येक पापण्यांना भार झालेत आसवांचे 
कित्येक सावल्यानं वेध लागले उन्हाचे 

कित्येक पावलांनी कापली मैले अनेक 
कित्येक ओठानी मौनात मानले सुख 

कित्येक शब्दांना फक्त लेखणीचा सहारा 
कित्येक मनांना फक्त आठवणींचा पहारा 

Sunday, August 23, 2020

ससा आणि कासव..नव्यानं

 ससा आणि कासवाने आता पुन्हा धावायचा ठरवलंय.. 

पण थांबण्यात काय आज आहे हे सश्याला नव्याने गवसलय.. 


की कशासाठी पळतो आहे याची उत्तरे ससा आता शोधू पाहतोय 

शर्यत जिंकण्यापेक्षा महत्वाचा तो पुन्हा धावतोय 


थोडा थांबला ससा म्हणून हरला असेल कदाचित 

पण गोड़ गाजर अन सुखाच्या झोपेची किंमत कासवाला नाही कळणार किंचित 


शेवटी काय पळणे महत्वाचे , अगदी शर्यत संपेपर्यंत पळायचा ...  

पण 

ससा आता पुन्हा थोडासा थांबणार , गाजर खाऊन पुन्हा एकदा झोपणार 

शर्यत तर पाचवीलाच पुजली आहे त्याचा , पण अशी सुखाची झोप पुन्हा पुन्हा नाही मिळणार.. 

मलई

 तुम्ही हि कधी खाल्ली असले तिच्याचबरोबर , शहाळं मधली मलाई... 

थोडीच स्वतःला आणि थोडीशी जास्त तिलाही.. 


प्रेमाचे ते क्षण अगदी मलाई सारखेच नाजूक आणि मऊसर असतात 

कितीही धरून ठेवले तरी अलगद हातून निसटू पाहतात 


त्या वेळी वाटत शहाळंचा समुद्र व्हावा.. 

त्याच्यातल्या गोड पाण्याला आणि तिच्या जवळ असण्याला कधी अंत नसावा.. 


शहाळं मधली मलाई... 

थोडीच स्वतःला आणि थोडीशी जास्त तिलाही.. 


- ओंकार 


Friday, August 21, 2020

पाऊस आणि आठवण

 पुन्हा पाऊस येणार आणि पुन्हा आठवण हि येणार . 

प्रत्येक थेंबा गणिक ,आठवण दाट आणि आभाळ निरभ्र होणार. 


पाऊस काय तीन मास थांबेल, जाईल अन पुन्हा येईल 

पण मना मध्ये खोल रुतून बसेल, आठवणींच पाऊल. 


आठवण पावसा सारखी, कि काळ्या ढगांसारखी ?

दाटून जरी आली,तरी स्वतःलाच करते पारखी 



पुन्हा पाऊस येणार आणि पुन्हा आठवण हि येणार . 

प्रत्येक थेंबा गणिक ,आठवण दाट आणि आभाळ निरभ्र होणार.

बचपन

 मेरे बचपन ने आज आखिर पलट के सवाल पूछ ही लिया   क्या पाया ऐसा तूने जो मुझे ठीक से अलविदा भी न कह पाया  चंद सिक्खे थे जेब में ,  खनक उनकी महस...