जेंव्हा जेंव्हा घरामध्ये येईल एखादी सून
तेंव्हा तेंव्हा सुरु होईल न संपणारी भून भून
भून भून कॅन नॉट बी क्रिएटेड , अँड कॅन नॉट बी डिस्ट्रोइड
फक्त ह्या दिवसा मधून त्या दिवसा मध्ये होते ट्रांसफरड
भून भून व्हायला नाही लागत काहीही कारण
लग्न केलाय, पण वाटत असा कि जन्म बायको जवळ तारण
इतकी बायकोची भून भून कि ती वाटते मधमाशी
अपॆक्षा मधाची पण भीती जास्त डंखाची
न पिता जहर कुणी होत नाही महादेव
आणि भून भून न ऐकेल तो कसला पतीदेव
हि भून भून न संपणारी आहे, तिला नाही अंत
लग्न न करणारे उगाच नाहीत होत पंतप्रधान आणि संत
- ओंकार
No comments:
Post a Comment