Thursday, April 29, 2021

ते तीन कोन ?

एक चौकोन त्याला चार कोन 

चारी बाजू समान , मग मोठा कोण अन छोटा कोण ?


एक कोन रुसतो ,आता चौकोन सोडायचा म्हणतो 

बाकी कोन  बिथरतात , ओशाळून त्रिकोण होऊन बसतात 


आता बाजू समान ठेवायला कसरत करावी लागणार 

ताठ बाण्याचा प्रत्येक कोन , आता काही अंशी वाकणार 


चौकोनांचा त्रिकोण झाला, आता सूत्र बदलणार  

आता उंची आली पाया आला ,आधी फक्त बाजूंचा गुणकार 


भूमितीने मध्ये आकृत्या पलीकडे बरच काही शिकवलं 

उगाच नाही त्रिकोणाला सगळ्यात  मजबूत बनवलं 


ओंकार 




No comments:

Post a Comment

बचपन

 मेरे बचपन ने आज आखिर पलट के सवाल पूछ ही लिया   क्या पाया ऐसा तूने जो मुझे ठीक से अलविदा भी न कह पाया  चंद सिक्खे थे जेब में ,  खनक उनकी महस...