तुला सोडून जरा लवकर इकडे आलोय, जमल तर मला माफ कर
तुझा माझा स्वप्नांचं छोटस एक घर कर
त्यांना भिंती दे, मायेचा एक छप्पर कर
ऐकवतील कधी ते तुला माझेच कंपित स्वर
पण ऐक , अशावेळीही जमल तर मला माफ कर
गोड आठवणी ताज्या कर
त्यालाही असेल थोडी दुःखाची थोडी जर
क्षण दोघांचेच करतील तुझ कातर
पण ऐक , अशावेळीही जमल तर मला माफ कर
उठ आता डोळे तेवढे कोरडे कर
जमेल तशी, थोडी का होईना गम्मत कर
तुला हसरं बघून मी पण आता हसेन वर
पण ऐक , अशावेळीही जमल तर मला माफ कर
पिल्लं आहेत आपली, त्यांना खूप मोठं कर
उडुदे उंच त्यांना, उरात त्यांचा जिद्द भर
मायेनं तुझा, आभाळ त्यांना ठेंगणं कर
पण ऐक , अशावेळीही जमल तर मला माफ कर
No comments:
Post a Comment