Tuesday, April 20, 2021

ती आणि तो , श्वास ...

ती कधी कधी त्याला लाडात विचारायची 

आलीच वेळ तर काय करशील माझासाठी 


तो हि तिला हलकेच बोलायचं , “चंद्र तारे आता झाले जुने 

तू आलीस आणि सर्वाथाने आयुष्याचे झाले सोने”


गोड बोलून तोही वेळ मारून न्यायाचा,आणि ती हि सुखवायची

तिचा मनातली प्रत्येक गोष्ट जणू त्याला डोळ्यांनी दिसायची 


त्याचा साठी ती जणू काही oxygen होती 

जरा दूर गेली कि श्वासांना हि आठवण व्हायची  


इतक्या दिवसांचा प्रवास त्याचा डोळ्यापुढून सर्रकन जात होता 

एक एक क्षण पकडून ठेवायला हि आता खर तर उसंत नव्हता 


लाखोंचा गर्दीत आता त्याला एकटा असल्याचा सतत भास 

ती मात्र त्याचा साठी लढवत होती, आयुष्याचा प्रत्येक श्वास

  

आता वेळ आली होती आणि त्याला तिला सांगायचं होत

सगळं करून पाहिलं , तरीही काहीतरी राहून गेल्याची खंत 


सौदा कसा करावा श्वासांसाठी , तीच तर त्याचा सर्वस्व होती 

आज त्याचा oxygenला सगळयात जास्त गरज oxygenचीच होती 


-ओंकार

No comments:

Post a Comment

बचपन

 मेरे बचपन ने आज आखिर पलट के सवाल पूछ ही लिया   क्या पाया ऐसा तूने जो मुझे ठीक से अलविदा भी न कह पाया  चंद सिक्खे थे जेब में ,  खनक उनकी महस...