Sunday, December 20, 2020

ते माझेच होते...

आज एक पांढरपेशी हॉटेल मध्ये एका so called educated मुलाचा आणि बापाचा भांडण चार चौघात पाहिलं. कोण बरोबर कोण चूक याचा निवाडा न करता पुढचा काही ओळी त्या दुर्दैवी ,थकलेल्या आणि कदाचित कुठेतरी चुकलेल्या बापाचा नजरेतून...
____________

झिजले यत्नानी कधीकाळी , ते उंबरे माझेच होते.
क्षण हसरे सोडून धावणारे, ते पायही माझेच होते.

ओलांडले नाही ओठांचे कुंपण ज्यांनी, ते शब्दहि माझेच होते.
दुरावले कधी न परताया , ते क्षण सुखाचे माझेच होते.

पाट वेळीच फिरवली ज्यांनी, ते आप्त हि माझेच होते.
उसळले तेंव्हाही नाही, ते रक्त हि माझेच होते.

पाश सुटले बांध तुटले , जे बांधले मी माझेच होते...
अन कट्यार घुसली जी काळजात, त्यावर ठसे हि माझेच होते....

-ओंकार

Saturday, December 19, 2020

शुभ्र एक चांदणी..

कैफात चांदण्यांचा , ती लक्ख एकाकी 
स्वयं प्रकाशी तरीही , शोधिसी उगा किरणांसी 

कुणी पाहिले सप्तर्षी , कुणी पाहिला ध्रुव तारा
एकटीच हंसूनि ती, हा खेळ पाही सारा 

दिवा स्वप्नात ती नेहमी , कवटाळून ठेवी उराशी टुमदार एक निमबोणी..  
वाडा होताच तो चिरेबंदी , लुप्त जाहली त्यात शुभ्र एक चांदणी..  

Thursday, December 17, 2020

कित्येक....

कित्येक पापण्यांना भार झालेत आसवांचे 
कित्येक सावल्यानं वेध लागले उन्हाचे 

कित्येक पावलांनी कापली मैले अनेक 
कित्येक ओठानी मौनात मानले सुख 

कित्येक शब्दांना फक्त लेखणीचा सहारा 
कित्येक मनांना फक्त आठवणींचा पहारा 

बचपन

 मेरे बचपन ने आज आखिर पलट के सवाल पूछ ही लिया   क्या पाया ऐसा तूने जो मुझे ठीक से अलविदा भी न कह पाया  चंद सिक्खे थे जेब में ,  खनक उनकी महस...