Friday, November 11, 2011

पुण्यात मोकाट ती.... ( PMT )


पुण्यात मोकाट ती.... ( PMT )

भारतात सूत्र एक ( formula one) होणार आशी बातमी कळली त्यावेळी वाटला आता पुण्याचं मानाच्या शिरपेचात आणखी एक feather चढणार. पण सरकार नावाच्या गाढव प्राण्याला आणि ज्यांनी कुणी स्पर्धा भरवली त्या नवकोट नारायणाला पुण्याच्या रस्त्यांची खबर नसावी कि काय किंवा इथली PMT नामक वाहन चालकाच्या विक्रमांची ख्याती नसावी मनून त्याने उत्तरेला प्रस्थान केला. असो पण भारताचा संघ स्पर्धेत भाग घेणार हे कळल्यावर तर मनापासून वाटला कि च्य्मारी आपली PMT धावणार आणि एखादी तर खाम्बावरची जागा घेणार ( पोल position ). कारण PMT च्या diesel मधेच लिहिला आहे आम्ही कुणाच्या मागे धावणार नाही सगळे आमच्या मागे धावतील , आम्ही हात बघून तर सोडाच कुणी अक्खे आडवे झालो तरी थांबणार नाही. एकदा मी एका PMT driver च्या समोर लिहिलेलं वाचाल " धावत्याला गती येई थांबला तो संपला " मग मला जाणवला कि बाबा ह्याची काही चूक नाही परंपरेच पालन कारण हा तर पुणेकरांचा सगळ्यात मोठा time पास आहे पण बिचारा कामातही संस्कृती विसरला नाही माझ्या डोळ्याला पाणी आला ( नंतर कळाल कचरा होता PMT चाच पण पाणी आला ) .

तर अश्या PMT चे दोन सूत्रधार. एक मागून टिकीतांची सूत्र चालवतो तर एक पुढून धार लावल्यासारखी गाडी चालवतो , वाहक आणि चालक फक्त आणि फक्त ह्या शब्दांमध्ये यमक आहे बाकी वागण्यात मात्र मुक्त छंद.

वाहक ह्या प्रवृत्तीचे पहिले प्रेम मणजे सुट्टे पैसे आणि दुसरे मणजे पुढे ढकलणे. मराठी असून मराठी लोकांना पुढे ढकलणारी एवढीच काय ती पृथ्वी तालावरील मराठी माणस. त्या कातडी पिशवी चा आणि तिकिटावर पंच करणाऱ्या त्या मशीनच मला नेहमी आकर्षण वाटत आल आहे. आता ते दिसत नाही पण तशी पिशवी घेऊन शाळेला जायची किती तरी वेळा इच्छा झाली आहे .मी लहानपणी बस मधून प्रवास करायचो तेंवा सगळे लोक त्यांना मास्तर अस का मानतात ह्याच मला कोड पडायचं नंतर मात्र शिकवण्याची फी भरताना लक्षात आले कि दोघांमध्ये साम्य काय आहे.

चालक ह्या प्रजतिला फ़क्त बसच्या १० % भागामधे रस आहे गाडीच्या मागचा भाग त्याच्या केबिन बरोबर धावतो की नाही एवढा पाहण्यासाठीच कदाची त्याला साइड मिर्रीर नावाचा निरुपयोगी अवयव दिला असावा.मला नेहमी ह्या ड्राईवर लोकांच न नेहमी कौतुक वाटत आला आहे मंजे सामान्य मसंसने जर पमी केबिन पाहिल तर त्य्मधे असता काय २ ३ विटा, पाण्याची बाटली एक टॉवेल , एक लोखंडी डंडा आणि आणि स्टीरिंग नमक गोल चाक त्यां काय हॉट देव जाने पण ह्या एवढ्या गोष्टीवर हा मानुस कस काय बस चालवतो काय माहित.

मुंबईच्या बससेसना बेस्ट का मानतात हे PMT अनुभवल्याशिवाय नाही कळायची.

No comments:

Post a Comment

बचपन

 मेरे बचपन ने आज आखिर पलट के सवाल पूछ ही लिया   क्या पाया ऐसा तूने जो मुझे ठीक से अलविदा भी न कह पाया  चंद सिक्खे थे जेब में ,  खनक उनकी महस...