काम जरा जास्त आहे ...दर वेळी वाटत...
भर मीटिंग मधे appraisal घेउन स्वप्न नव दाटत..
तरी बडबड चालत राहते डोक चालत नाही...
कस्टमर शिवाय मीटिंग मधे कोणीच बोलत नाही...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
तितिक्यत कुठून अजुन एक कस्टमर कॉल वरती येतो...
रिजल्ट मधल्या चूका वेशीवरती टांगतो....
आमी पळवाटा हुड़कत सैरावैरा धावतो...
hi how are you ? मनुन विषय वळवून बघतो...
दुपार टलून संध्याकाळचा सुरु होतो खेळ..
कितीही नको मनल तरी मीटिंग ची जालेली असते वेळ..
चक्क कस्टमर समोर मेनेजर शिव्या देऊन घेतो ....
मीटिंग आंधी आमच्या मधे कुठून इतका " गार - व्हा " येतो..