
हल्ली मला वाढत्या पोटाची भयंकर भीती वाटू लागली आहे आणि त्यापेक्षाही त्याच्यावर उगीचच सल्ले देन्यार्यांची तर जरा जास्तच...पोटा वर ( अर्थातच वाढत्या ) फुकट सल्ले देनार्याना सरकारने " पोटा " च्या कायद्या खाली अटक करावी असाच वाटू लागलय आता . " सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला,पहाटे उठून रोज पलायाला जावा " इति पितामह .." तू .... आसन करायला सुरवात कर आणि मघ बघ सकाळी केलास तर दुपारपर्यंत २ इंच पोट कमी ......८ दिवस कर पोट कुठ आणि पाठ कुठ आहे हे बघनार्याला शोधून ही सपदयाच नाही .... " किंवा " अरे तू तो बेल्ट का घेत नाहीस २ तास घालून नुसत बसयाच आणि पोट कमी ..."ह्यातल्या नुसत बसयाच ह्या शब्दांवर तस माजा खुप जिव आहे ....कारन मी हल्लीच नोकरीला लागलो आहे..." अहो तुमच्या एवढे होतो तेंवा आमला पोट तर नवतच पण पाढे देखिल पाठ होते ..." आता ह्या सल्यातुन नक्की काय मनायाच आहे काय माहीत मनजे राग नक्की कशाच पोटाचा की आमला calculator मिळाले याच देव जाने... " अरे gym ला चल दोन महिन्यात सिक्स पैक एब्स होतील बघ " अरे गरिबाला कशाला पाहिजेत एवढे एब्स एका वर समाधानी आहोत आम्ही..१०० कोटींच्या आपल्या देशात दरडोई जर सहा पैक मिळाले तर एवढे पैक ठेवायचे तरी कुठे ? आणि cos cutting मधे सहा सहा पैक परवादनर तरी आहेत का ?आशी कारन देखिल फेकवि वाटतात सगाल्यांच्या तोंडावर आणि पोटावर बाकी आईला मात्र या सहा पकितांच काही भारी कौतुक नसत. मी अर्धा दज़न एब्स करण्यापेक्षा अर्धा दज़न केळी तिने आणलेल्या केळी पेक्षा स्वस्त असली तर तिला जास्त कौतुक वाटते. मला स्वप्नात देखिल आता ६ एब्स दिसू लागले आहेत. मनजे मी कुठल्या तरी channel वर ( ज्यावेळी कोणी टीवी बघत नाही आशा वेळी ) कुठल्यातरी brand साथी add करत आहे आणि सांगत आहे की " मई पहले काफी मोठा होतो और मग एक दिवस मुझे ये प्रोडक्ट मिळाला आणि मी ही क्रीम पोटावर घासली आणि काय चमत्कार मला एकच्या जगी सहा एब्स मिळाले ...अब मुझे office में काम भी मिल गया है..मेरी जिंदगी निराशासे बहार आली आहे ...etc..etc....."मला आता रस्तावर एखादा भिकारी देखिल माज्याकडे " भिक नको पण पोट आवारा " अश्या व्याकुल भावनेने बघिताल्याच भास् होतो. बाकि या ६ पैक चा आणि आमचा ३६ च आकडा का असावा काय माहीत ?कदाचीत ३६ = ६ x ६ मनुन देखिल असू शकतो .... :) बाकि काय मान्यच आहे मला की ....एखाद्याच्या पोटा वर पाय देऊ नए आणि वाढलेल्या पोटावर ( तर साध ) बोट ठेऊ नए." कारन पोट मनजे पोट असत तुमच आमच सेम असत ...कुनाच छोटा कुनाच मोठ असत पण पोट मनजे पोट मनजे पोट असत..."